सुरजागड खाणपरिसरात नव्या स्फोटांना विरोध, माडिया समाज अस्तंगत होण्याची भीती
आगरी मसेली, बांडे, दमकोंडवाही या गावांमध्येही अशाच प्रकारचे अवैध खाणकाम सुरू असल्याचा आरोप आहे.
गडचिरोली जिल्ह्यातील एटापल्ली व भामरागड तालुक्यामध्ये सुरू असणाऱ्या खाणकामाचा नवा टप्पा पर्यावरण व स्थानिक प्रशासनाचे नियम धाब्यावर बसवत सुरू झाला आहे. नव्या सत्रात पुन्हा कामाला सुरुवात करताना जिल्ह्यातील लॉईडस मेटल्स अंड एनेर्जी लिमिटेड या कंपनीच्या मंडळाने १८ ऑगस्ट रोजी सुरजागड पट्टी परिसरामध्ये खाणकामासाठी व नवे ब्लास्ट करण्यासाठी परवानगी मागितली होती.